Bramhapuri Heavy Rain: ब्रम्हपुरी तालुक्यात उद्या 10 जुलै ला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी! | Batmi Express

Bramhapuri School And College Holiday,Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri College Holiday,Bramhapuri Heavy Rain,

Bramhapuri School And College Holiday,Bramhapuri,Bramhapuri News,Bramhapuri Today,Bramhapuri College Holiday,Bramhapuri Heavy Rain,
ब्रम्हपुरी तालुक्यात उद्या 10 जुलै ला शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने 7 जुलै 2025 रोजी दिलेल्या अंदाजानुसार "ऑरेंज अलर्ट" जारी केला असून, पुढील काही दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूरचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी. यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि खाजगी कोचिंग क्लासेसना उद्या, 10 जुलै 2025 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. (Bramhapuri School And College Holiday)

या संदर्भात जारी केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी गौडा यांनी म्हटले आहे की, गोसीखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून मिळालेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार, गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणातून वैनगंगा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी 16500 ते 18000 क्यूमेक्सपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय गौडा जी सी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2)(5) व (18) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करत हा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ब्रम्हपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून, गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सदर आदेश फक्त  ब्रम्हपुरी तालुक्यासाठी लागू राहील. जिल्ह्यातील अन्य  तहसील क्षेत्रांतील शाळांना हा आदेश लागू होणार नाही. सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्कालीन व्यवस्थापनाचे कामकाज करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.