तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Suicide: मुलांसह आत्महत्येसाठी आई गेली विहिरीवर | Batmi Express

Sawali,Sawali News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,Chandrapur Crime,Sawali Suicide,

Sawali,Sawali News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,Chandrapur Crime,Sawali Suicide,

सावली:-
 मुला-मुलीला घेऊन आईने विहीर गाठली. मुलाला शंका आली. त्याने आईचा हात झटकून तिथून पळ काढला. मात्र मुलीला घेऊन आईने विहिरीत उडी घेतली. या घटनेत माय-लेकीचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस येताच चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील खेडी या गावात ही घटना संध्याकाळी पाच वाजताचा सुमारास उघळकीस आली.

दर्शना दीपक पेटकर (35), समीक्षा दीपक पेटकर (14) अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. मूल शहरातील दीपक पेटकर यांची खेडी शिवारात शेती आहे. पत्नी दर्शना, मुलगी समीक्षा व मुलगा सोहन हे शेतात गेले होते. आई दर्शनाने दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास स्वत:च्या शेताला लागूनच असलेल्या शेतकऱ्याच्या विहिरीत मुलगी समीक्षा हिला ढकलं. मुलगा सोहन याचा हात पकडून विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोहनने हात झटकून तिथून खेडी गावात पळ काढला.

मुलगा गावात गेल्याचे पाहून आई दर्शनानेही त्याच विहिरीत उडी घेतली. यात माय-लेकीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार जीवन राजगुरु,हवालदार मोहुर्ले, पोलीस कर्मचारी कपिल भंडारवार यांनी घटनास्थळ गाठले. दोघांचाही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.