ट्रकने चिरडले दुचाकीस्वारास, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर | Batmi Express

Chamorshi,Chamorshi Accident,Chamorshi News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Today,

Chamorshi,Chamorshi Accident,Chamorshi News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli live,Gadchiroli Today,

चामोर्शी
:- एका ट्रकने दुचाकीला जब्बर धडक दिल्याने एका ईसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चामोर्शी जवळील सोनापूर फाट्यावर घडली चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील सोनापूर क्रासिंग जवळ दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला असून,  सुरेश महादेव दुधबावरे, रा - सोनापूर हे आपल्या काही कामा निमित्य MH33 Z 6877 या दुचाकीने चामोर्शीला गेले होते  वापस येतांना सोनापूर क्रासिंग जवळ जिंदाल स्टील कंपनीच्या ट्रक CG ०७,BG५५९७ ने बाईकला जब्बर  धडक दिली हा अपघात एवढा भयानक होता की इथे सुरेश दुधबावरे यांच्या जागीच मृत्यू झाला . 

तर लुकेश रामभाऊ दुधबावरे हे गंभीर जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.