तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Nirghun Murder Exposed: कुरुड गावातील निर्घून हत्येचा अखेर पर्दाफाश | Batmi Express

wadsa,Wadsa news,Wadsa Crime,Wadsa live,Wadsa Today,wadsa muder,muder,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Murdered,Gadchiroli Crime,

wadsa,Wadsa  news,Wadsa Crime,Wadsa live,Wadsa Today,wadsa muder,muder,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Murdered,Gadchiroli Crime,

गडचिरोल्ली:
-दिनांक 08/02/2024 चे 15:00 वा. ते दिनांक 09/02/2024 चे 08:00 वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने मृतक नामे प्रदिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार, वय 30 वर्षे रा. कुरुड तह. देसाईगंज, जि. गडचिरोली यांचे डोक्यावर मारुन त्यास गंभीर जखमी केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.  त्यानुषंगाने पोस्टे देसाईगंज येथे मर्ग क्रमांक 04/2024 कलम 174 जाफौ. अन्वये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. 

सदर अकस्मात मृत्युमध्ये अधिक तपास करुन मय्यत नामे प्रतिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार याचे डोक्यावर मारुन त्यास जिवानिशी ठार मारणा­या अज्ञात आरोपीविरुध्द पोलीस उपनिरीक्षक संजय गोंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे दिनांक 28/02/2024 रोजी अप क्र. 065/2024 कलम 302 भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.  सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीने कोणत्याही स्वरुपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने घटनेचे गांर्भीय लक्षात घेता, मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीय आणून आरोपीस अटक करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले सा. यांनी पोलीस निरीक्षक श्री. अजय जगताप यांचे नियंत्रणाखाली एक तपास पथक नियुक्त केले.  त्याप्रमाणे तपास पथकाने मौजा कुरुड गावातील लोकांकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली असता, साक्षीदारांचे बयाणावरुन व पोलीस उपनिरीक्षक धनगर, पोअं/ढोके यांनी मिळविलेल्या गोपनिय बातमीदारांच्या माहितीवरुन संशयीत इसम नामे विकास जनार्दन बोरकर वय 50 वर्षे, धंदा-मजुरी रा. कुरुड तह. देसाईगंज, जि. गडचिरोली याची गुन्ह्राच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करुन तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्ह्रामध्ये दिनांक 06/03/2024 रोज सायंकाळी 17:09 वा. अटक करण्यात आली.अधिक तपासात असे दिसून आले की, मय्यत हा आरोपीची पत्नी व मुलगी यांचेकडे वाईट नजरेने बघायचा व त्यांना वाईट वाईट कमेंट करायचा व त्यांचे घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करायचा.  त्यामुळे मय्यत व आरोपी यांच्यात नेहमी झगडा भांडण होत होते.  दिनांक 08/02/2024 रोजी रात्रो 10:00 ते 10:30 वा. चे दरम्यान मय्यताने आरोपीस अश्लील भाषेत वाईट वाईट शिवीगाळ केल्याने आरोपीने मय्यताचे डोक्यात सिमेंटच्या कवेलुने मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याची माहिती समोर आली. सदर गुन्ह्रात कोणतेही पुरावे नसताना केवळ गोपनीय माहितीच्या आधारावर आणि साक्षिदारांचे बयाणावरुन आरोपीस निष्पन्न करुन त्यास अटक करुन अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले. आरोपीला मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट देसाईगंज यांचे समक्ष रिमांडकामी हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक 07/03/2024 ते दिनांक 11/03/2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे.  सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करीत आहे 

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक श्री. अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोउपनि. ज्ञानेश्वर धनगर, पोना/2973 राऊत, पोअं/5538 ढोके, पोअं/3864 कुमोटी, पोअं/4032 सराटे व पोअं/3755 शैलेश तोरपकवार यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.