नागपूर:- एका तरुणाने अकरावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली.पोट दुखत असल्याने डॉक्टरकडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रतापनगर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक केली. अभिनव रवी हाडके (२३) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मार्च ११, २०२४
0
पीडित मुलगी अकराव्या वर्गात शिकते. ती रोज सकाळी अंबाझरी उद्यानात फिरायला जात होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये तिची ओळख अभिनव याच्याशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. अभिनवने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला घरी घेऊन जात अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला असता अभिनवने लग्नाचे आमिष दाखविले. मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अभिनव आणि मुलीच्या भेटीगाठी कमी झाल्या. काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागले. तिने याबाबत आईला सांगितले. आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरने ती गर्भवती असल्याचे सांगितले. आईच्या पायाखालची जमीनच सरकली. चौकशीत अभिनवचे नाव समोर आले. अभिनव विरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्ट च्या कलमान्वये गुन्हा नोंदवून अभिनवला अटक केली.
नोट: बातमी एक्सप्रेस पब्लिकेशन हाऊस बलात्कार किव्हा अन्य अत्याचार बातमी लेखनात अल्पवयीन मुलगी किव्हा महिलेचा नाव प्रकाशित करीत नाहीत.
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.