चंद्रपूर::- 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्ययात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सर्व पोलिस चंद्रपूर जिल्हा पोलिस मुख्यालयात नियुक्त आहेत. पोलीस कॅन्टीन मध्ये मांसाहार केल्यानंतर उलटी व मळमळ वाटू लागल्याने सर्वाना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलिस मुख्यालयात नियुक्तीला असलेल्या 41 पोलीस जवानांना जेवणातून विषबाधा झाली आहे. पोलीस कॅन्टीन मध्ये मांसाहार केल्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्यांना उलटी आणि मळमळ होऊ लागली. सर्वांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 38 पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर, तीन कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. यासंदर्भात चौकशी केली जात आहे.
पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून जेवणाचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. विषबाधेचे मुख्य कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच समोर येईल.