गडचिरोली:-जिल्ह्यातील चारवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद व मन हेलावून टाकणारी घटना जारावंडी येथे घडली आहे ,या प्रकरणी आरोपीला गजाआड करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिसांनी दिली. संतोष नागोबा कोंढेकर वय ५० असे या नराधामाचे नाव असून तो पीडित बालिकेच्या शेजारी राहतो.
सविस्तर वृत्त असे की आरोपी हा जारावंडी येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे चपराशी या पदावर कार्यरत आहे दरम्यान पीडीत बालिका ही आरोग्य केंद्राच्या समोरच राहायची, यात आरोपी शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान बालिकेला आपल्या वसाहत येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करून पसार झाला,अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली दरम्यान पीडित बालिकेला गडचिरोली येथे महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने नागपूरला हलवण्यात आले असून बलिकेवर उपचार करण्यात येत असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याची माहिती जारावंडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस मोहिते यांनी दिली आहे.आरोपी वयस्क असून त्यास दोन मुलेही आहेत
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.