एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी येथील एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला. ही बाब घृणास्पद व मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी नराधम संतोष नागोबा कोंढेकर (50) रा. भेंडाळा यास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडितेच्या उपचारात हयगय करणार्या आरोग्य कर्मचार्यांवरही योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन (नारी शक्ती) यासह विविध आदिवासी सामाजिक संघटनेने आज आयोजित पत्रपरिषदेतून केली आहे.
|चार वर्षीय बालिकेवर 50 वर्षीय नराधामकडून लैंगिक अत्याचार
त्यांनी म्हटले की, आरोपी संतोष कोंढेकर हा जारावंडी येथील आरोग्य केंद्रात कर्मचारी असून तो पीडित बालिकेच्या शेजारी असलेल्या शासकीय वसाहतीस राहत होता. आरोपीने शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान बालिकेला आपल्या वसाहतीते बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचार झाल्याची माहिती कळताच पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडित बालिकेला वेळेवर उपचारही मिळाले नाही. त्यामुळे तिच्या उपचारातही हयगय झाली. त्यामुळे आरोग्य कर्मचार्यांवरही कारवाई झाली पाहिजे. तसेच आरोपी संतोष कोंढेकर यास भा.द.वि. कलम 376 व अन्य पोट कलम आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्ष अधिनियम 2012 (पोस्को) व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार अपराध नोंद करून फाशीची शिक्षा द्यावी, तसेच सदर पीडित मुलीच्या पुढील शिक्षण व तिच्या घरच्या एकाला शासकीय नोकरीत घेण्यात यावे, अशीही मागणी संघटनेने यावेळी केली आहे. पत्रपरिषदेला जयश्री येरमे, रेखा तोडासे, भरत येरमे, विद्या दुग्गा, शामला घोडाम, मंजूषा आत्राम, पुष्पलता कुमरे, वासुदेव शेडमाके, सुनील पोरेड्डीवार, सुनील पोरेड्डीवार, कालिदास गेडाम, अरुण शेडमाके, अमोल कुळमेथे आदी उपस्थित होते