Murder: डोक्यात गोळी घालून तरुण उद्योजकाची हत्या | Batmi Express

Chhatrapati Sambhajinagar,Chhatrapati Sambhajinagar Live,Chhatrapati Sambhajinagar News,Chhatrapati Sambhajinagar Today,

Chhatrapati Sambhajinagar,Chhatrapati Sambhajinagar Live,Chhatrapati Sambhajinagar News,Chhatrapati Sambhajinagar Today,

छत्रपती संभाजीनगर:-
 छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) डोक्यात गोळी झाडून लघु उद्योजकाचा खून करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुज एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे.

या हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीने धुळे सोलापूर महामार्गावरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. ही घटना रात्री वाळुज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथे बालाजी नगरात घडली आहे. शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सचिन साहेबराव नरोडे, असं हत्या झालेल्या लघुउद्योजकाचं नाव आहे. दरम्यान हे मारेकरी त्याच्या ओळखीचे असावेत, असा पोलिसांचा (Crime News) प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि पोलीस उपायुक्त नितीन बगाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाच्या सूचना केल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.