गडचिरोली : आष्टी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या, वाहनासह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केले.
छत्तीसगड व तेलंगणा राज्यात होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रिया मध्ये अवैध दारू वाहतुक याची माहिती काढून कारवाई करणे बाबत आदेक्षित केले असून त्या अनुषंगाने काल रात्री २२.०० वाजता गोपनीय माहिती द्वारे माहिती प्राप्त झाली की, एका चार चाकी वहाणा मधून विधानसभा निवडणुक होत असलेल्या छत्तीसगड राज्यात कोनसरी मार्गे अवैध दारू वाहतुक होणार आहे अशी माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने कोनसरी टी पॉईंट येथे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नाकाबंदी केली असता एक संशयित वाहण MH - ३१ CR ९३१९ स्विफ्ट डिझायर व त्याचा चालक दीपक रेड्डी रा. चंद्रपूर हे मिळून आले. नमूद वाहनास पंचासमक्ष चेक केले असता त्यामध्ये देशी दारू १ लाख २० हजार /- रूपयांची व वाहन ३ लाख ८० हजार /- रुपये असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल मिळून आला आहे. नमूद आरोपी याचे वरती गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आष्टी पोलीस करित आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी विभाग) यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पवार, पो. हवा. निमसरकार, पो. शि. राजुरकर, रायसिडाम, तोडासे यांनी पार पाडली.