चिमूर:-दि. ०२/११/२०२३ ला सकाळी ५ वाजताच्या सुमारास विष्णू विनोद कामडी (वय १० वर्षे ) व्यायाम करण्याकरिता जय लहरी जय मानव विद्यालय येथे गेला होता. पण अगदी जवळीलच असलेल्या गोवर्धन रंदये यांच्या शेतात शौचास जाऊन येत असतांनाच हाताचा स्पर्श कंपाऊंड केलेल्या शेतातील तारेला झाला असल्याने इलेक्ट्रिक करंट लागून विष्णू विनोद कामडी (वय १० वर्षे ) रा.मदनापूर हा जागेवरच मरण पावला.
शेत हे अगदी रोडच्या कडेला असल्यामुळे शेतात इलेक्ट्रिक करंट लावणे गुन्हा आहे. याची नेहमीच जनजागृती केली जाते. व जंगल लागून असल्याने मदनापूर हे पर्यटन स्थळ म्हणून नावाजलेले आहे. हि घटना अत्यंत दुःखद असून सर्वत्र मदनापूर मध्ये शोककळा पसरली आहे. जनावर शेतात घुसून पिकाची नासधूस करु नये हा अनुषंग शेतकऱ्यांचा असतो परंतु जिवंत विद्युत तारेचा करंट लावणे हा गुन्हा आहे.म्हणून शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.मुलाचे शव शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.