गडचिरोली : अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपींना ३ वर्ष सश्रम कारावास | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Desaiganj,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,Desaiganj,

 गडचिरोली :गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश- आर. आर. खामतकर यांचा निर्णय.

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 01/06/2021 रोजी श्री. प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली व पोलीस स्टाफ असे प्रोव्हीजन रेड करीता मुरखळा भागात गेले असता मुखबीर कडून खात्रीशीर गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी नामे स्वामी नरसय्या गणवेनवार रा. मुरखळा हे देशी विदेशी दारु बागळून विक्री करीत आहेत. अशा खात्रीशीर गोपनिय माहीतीवरुन पंचा समक्ष आरोपीचे घर झडती घेतली असता विदेशी दारुच्या निपा मिळून आल्याने आरोपी विरुध्द कलम 65 (इ) म.दा.का. अन्वये नोंद करुण तपास घेतला.

Gadchiroli News | Gadchiroli | Gadchiroli Live | Gadchiroli News IN Marathi

सदर गुन्हयाचा तपास पोहवा/1928 रमेश उसेंडी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करुन आरोपी विरुध्द भरपुर व सबळ पुरावा गोळा करुन मा. न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले असता मा. न्यायालयाने द्मद्मड़ नं. 389/2021 अन्वये खटला चालवुन फिर्यादी व साक्षीदार तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्र धरुन आज दि. 12/09/2023 रोजी आरोपी नामे स्वामी नरसय्या गणवेनवार, वय 53 वर्ष रा. मुरखळा त. जि. गडचिरोली यास मा. प्रथम श्रेणी न्यायाधीश आर.आर. खामतकर यांनी कलम 65(इ) अन्वये 03 वर्ष सश्रम कारावास व 25000/- दंडाची शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील श्री. बी. के. खोब्राागडे यांनी कामकाज केले तसेच संबंधीत प्रकरणात साक्षीदारांशी योग्य समन्वय साधून प्रकरणाची निर्गती करीता पोहवा/2277 दिनकर मेश्राम, पोअं/3991 हेमराज बोधनकर यांनी योग्य भूमिका पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.