आरमोरी: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी | Batmi Express

Be
0

Gadchiroli News,Gadchiroli,Armori Live,Gadchiroli Batmya,Armori,Armori News,Leopard Attack,

आरमोरी
: तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये जखमी झालं आहे. शेतकऱ्याला तात्काळ उपचार घेण्यासाठी आरमोरी तालुका  येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल आणि त्यावर उपचार सुरू केल. सध्या जखमी शेतकर्‍याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 

Gadchiroli  | Armori Live | Gadchiroli Batmya | Armori | Armori News | Leopard Attack

ताजा मिळालेल्या माहितीनुसार, आरमारी तालुक्यातील पोरला वन शेत्रातील सिर्सि बीट अंतर्गत लोहारा येथील शेतकरी नामे श्री सुनील वक्तूजी मेश्राम हे  आज दिनांक 12- 9-2023 मंगळवार रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या सर्वे न ५/२ शेतामध्ये शेताचे कामे करण्याकरिता गेले होते. मात्र शेतामध्ये काम करीत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने सुनील व मेश्राम या शेतकऱ्यावरती बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यांमध्ये शेतकऱ्यावरती गंभीर दुखापत झाली असून शेतकऱ्याला वनविभागाच्या कर्मचारी बीटचे क्षेत्र सहाय्यक श्री बोगा वनरक्षक श्री गडपयले वनरक्षक सलोटे यांनी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. मात्र प्रकृती धोक्यावर असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे.  पुढील घटनेचा तपास वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होऊन सुरू असल्याचे समजते .बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला वनविभागाच्या वतीने योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा असे सुद्धा लोहारावासीयांकडून बोलले जात आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->