वडसा पोलीसांनी ३३ लाख रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु जप्त, दोन आरोपी जेरबंद | Batmi Express

wadsa,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli News,Wadsa News,Desaiganj,

wadsa,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli News,Wadsa News,Desaiganj,

वडसा/ 
देसाईगंजगडचिरोली जिल्हयात अवैध सुगंधीत तंबाखु तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.

Wadsa | Desaiganj | Gadchiroli | Gadchiroli News | Wadsa News 


आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आज दिनांक 11/09/2023 रोजी अवैद्यरित्या प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक होणार आहे. अशी खबर पोअं/5538 ढोके पोस्टे वडसा/ देसाईगंज यांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री. रासकर पोलीस स्टेशन वडसा/ देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार राऊत, ढोके सराटे,कुमोटी असे सापळा रचुन ईसम नामे 1) आशिष अशोक मुळे, वय 30 वर्ष, रा. खरबी, पोस्टे खेड, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर 2) अतुल देविदास सिंधीमेश्राम, वय – 29 वर्ष, रा. भवानी वार्ड ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपुर यास पकडले व त्याचे ताब्यातुन 1) लाल रंगाची टाटा कंपनीची आयशर वाहन क्र. एमएच 40 सिएम 6552 कि. अंदाजे. 10,000/- रुपये 2) 24 नग मोठ¬ा पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चंुगळीमध्ये प्रत्येकी 6 नग पांढ­या रंगाचे कट्टे व त्या प्रत्येक कट¬ामध्ये 11 नग पॅकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत 640 रुपये असे एकुण 10, 13,760/- रुपये 3) 21 नग मोठ¬ा हिरव्या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येकी 4 नग पांढ­या रंगाचे कट्टे व प्रत्येक कट्टयामध्ये 44 नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत 3,100/- रुपये असे एकुण 11, 45,760/- रुपये 4) 14 नग लहान पांढ­या रंगाचे प्लॅस्टीकच्या चुंगळीमध्ये प्रत्येक कट¬ामध्ये 44 नग पॉकेट व त्यावर ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेल्या प्रत्येक पॉकेटची किंमत 310 रुपये असे एकुण 1,90,960/- रुपये असा एकुण 33, 50, 480/- रुपय (तेहतीस लाख पन्नास हजार चारशे एेंशी रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन सदर बाबत मा. अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांना माहिती देण्यात आली तसेच पो.स्टे. वडसा/ देसाईगंज येथे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन गडचिरोली यांचे फिर्यादी वरुन गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. साहिल झरकर सा., यांचे मार्गदर्शनात पोस्टे वडसा/ देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक श्री. किरण रासकर यांचे नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोअं/दिनेश राऊत, नरेश कुमोटी, विलेश ढोके व संतोष सराटे यांनी पार पाडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.