आरमोरी : गडचिरोली जिल्हा दारूबंदी असताही तालुक्याचे ठिकाण व शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या, नव्यानेच नगरपरिषद म्हणून उद्यास आलेल्या, मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या,
आरमोरी शहरात इंग्लिश, देशी, वीदेशी, दारुचा उहापोह चौकाचौकात बेधडक व बेलगाम खुलेआम बघायला मिळतो आहे. यावर संबधीत स्थानीक प्रशासनाचे कसल्याही प्रकारचे नियंत्रण असल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळेच आरमोरी, वैरागड, वडधा सारख्या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी राजरोसपणे इग्लीश, देशी, विदेशी मद्य विक्री होतांना दिसुन येत आहे. यामुळे चौकाचौकात सायंकाळच्या सुमारास तोबा गर्दी निर्माण होत असून एकप्रकारे तळीरामाची जत्राच भरली की काय असे दृश्य बघायला मीडतात.कोणती पाहीजे, कीती पाहीजे, कुठं पाहीजे, जेव्हा पाहीजे तेव्हा अगदी फोन केला की लगेच ब्राड हजर.. फोन करा घरपोच दारु मीडवा असे प्रकार अगदिच दिवसाढवळ्या आरमोरी शहरात बघायला मीडत आहेत. याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला सोसावे लागते. याउलट मद्दविक्रेते मालामाल होत असुन पिणारे मात्र कंगाल होत आहेत. याशिवाय सर्वसामान्य जनतेच्या संसाराची वाताहात होताना जाणवते. संबधीत विभागाकडून केस होत नाही असे नाही. केस होतात पण काहीप्रमाणात थातूरमातूर केसेस होताना दिसतात. मुख्य दारुमाफीया मात्र मोकाटपने वावरताना दिसतो. जिल्हाबंदी असताना बाहेरुन मुद्देमाल येतो कुठुन आणी कसा? या सर्वागीण बाबीस प्रामुख्याने जबाबदार कोण? यावर मोठी कारवाई का होत नाही? संबंधित प्रशासन सुस्त का? असे अनेक खडबडजनक सवाल उपस्थित होत आहेत.
दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात. शिवाय युवा वर्ग नशेच्या आहारी जात असुन व्यसनाधीन बनत चालला आहे. कुणी चौकात, कुणी रस्त्याच्या कडेला ‘तल्लु’ होऊन पडुन असल्याचे अनेक उदाहरण बघायला मिळतात. दारूमुळे अनेकानी जीव गमावला असुन अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. आरमोरी शहरात तसेच वैरागड व वडधा, मानापुर परीसरातील ग्रामीण भागातही खुलेआम होत असलेल्या मद्दविक्रीमुळे आरमोरी शहरातील तद्वतच ग्रामीण भागातील शांतता व सुव्यवस्था भंग होत चालली आहे. सबंधित स्थानिक प्रशासन मात्र बघ्याचीच भूमिका वटवतोय त्यामुळे यावर संबंधीत जिल्हा प्रशासनाने लक्ष घालुन संबंधित मद्य विक्रेत्यांवर व मुख्य डीलर यावर तातडीनं कठोर कारवाई करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी परिसरातील जनतेकडुन मागणी होत आहे.