सिंदेवाही : काही महिन्याआधी एका अल्पवहीन मुलीसोबत २४ वर्षीय विवाहित मुलाने लैंगिक संबंध करुन ही माहिती कोणालाही सांगू नको अन्यथा मी तुझी बदनामी करणार अशी धमकी दिली. वडिलासोबत मुलगी रुग्णालयात गेल्याने प्रकरण समोर आले. मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन सिंदेवाही पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
प्राप्त महितीनुसार, सिंदेवाही येथील विद्यानगर परिसरातील शुभम पुरुषोत्तम नागोसे (२४) याचे तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध होते. प्रेम संबंधाच्या आळी या मुलाने मुलीसोबत जबरदस्तीने काही महिन्या आधी लैंगिक संबंध केले होते. लैंगिक संबंधानंतर या मुलाने मुलीला तु ही माहिती इतरांना सांगू नको, नाही तर मी तुझी बदनामी करणार, तसेच तुला जीवे मारणार अशी धमकी दिली होती.
मुलाने धमकी दिल्याने ही माहिती मुलीने कोणालाही दिली नाही. काही दिवसाआधी मुलीची प्रकृती बिघडल्याने तिचे वडील चंद्रपुर येथील एका खाजगी रुग्णालयात नेले असता मुलगी सात महिन्याची गरोदर असल्याची डॉक्टरांच्या निदर्शनात आले. मुलगी अल्पवहीन असल्याने डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी मुलीला विचारणा केली असता, विद्यानगर परिसर सिंदेवाही येथील शुभम पुरुषोत्तम नागोसे (२४) याने लैंगिक संबंध करुन कोणालाही न सांगण्याची धमकी दिल्याची माहिती दिली. बुधवार २० सप्टेंबर रोजी तक्रार दाखल करुन सिंदेवाही पोलिसांनी अधिकचा तपास करुन आरोपी शुभम नागोसे याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठड़ी सुनावली आहे. आरोपी हा विवाहित आहे. पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहे.