वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यातिल दारूबंदी हटल्यानंतर आता दारू सर्वत्र मिळत असल्याने दारू पिणारे नागरिक वैध दारू दुकानात रितसर दारू पिनार असे चित्र सर्व जिल्यात दिसणार अशी आशा होती , मात्र जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अवैध दारू विक्रीचे स्रोत निर्माण झाल्याने अनेक शेकडो अवैध दारू विक्रेते जिल्ह्यातच नव्हे तर याचे पाळेमुळे ग्रामीण क्षेत्रातही रोवल्या गेल्याने या दारू विक्रीतून प्रंचड पैसा जमा करतांनाच पोलिसांनीही आपले हात धुवून घेतले दारूबंदी हटल्यानंतर हे अवैध दारुविक्रेते आताही शहरात , ग्रामीण भागात यांचा मोठया प्रमाणत जम बसलेला आहे.
त्यातच पोलीस अधिकारी ही याचा फायदा घेत अवैध दारू विक्रीला अघोषित परवाना देत मोठ्या प्रमाणात माया जमवण्यात गुंतलेले असल्याने कोणत्याही दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्याने अखेर महिलांना या विरोधात रस्त्यावर उतरत निवेदन द्यावे लागले यापेक्षा मोठी शोकांकिता कोणती पोलीस अधीक्षक साहेब तुम्हीच सांगा ?अखेर महिलांनी दिनांक 13 सप्टेंबर उपविभागीय पोलीस कार्यालय गाठून तक्रार दिली. गावातील ईश्वरी महिला ग्रामसंघ, उज्वला महिला ग्राम संघ आणि शेकडो महिला चिकणी या गावातील यांनी दहा दिवसापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये ग्रामपंचायत ठराव घेऊन गावातील अनाधिकृत दारू व जुगार बंद करावा यासाठी निवेदन वजा तक्रार दिली, परंतु अद्यापही गावातील अवैध दारू विक्रेत्याविरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने त्यांचा विरोधात तक्रार दिल्यानंतर मात्र महिलांवर होणारा मोठा मानसिक त्रास वाढलेला आहे, तुम्ही आमचं काही खुडू शकत नाही असे टोमणे महिलांना दारूच्या नशेत हे अवैध दारू विक्रेते डोळे मारणे, अश्लील भाषेत बोलण्याचे प्रकार खुलेआम सुरू झाले आहे त्यामुळे अवैध दारू विक्री अवैध जुगार या विरोधात तक्रार करणे आमचा गुन्हा आहे का पोलीस अधीक्षक साहेब तुम्हीच सांगा ! तक्रार करत्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ करणे ,अश्लील हावभाव, मध्यरात्री घराजवळ ओरडणे दरवाजे वाजवणे, शारीरिक विटंबनेचा हेतू साध्य करून पाहणे अशा प्रकारच्या मानसिक, शारीरिक त्रास सुरू झाल्याने महिला त्रस्त झाल्या आहे याची वाचता करण्यास महिला घाबरत आहे संपूर्ण महिलांनी शेवटी आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून शांत न बसता या विरोधात विडा उचलला वरील या सर्व छळापासून भयमुक्त जीवन जगण्यासाठी महिलांनी पोलीस विभागाला निवेदनातून कारवाई करणे अपेक्षित होते परंतु या गुंड प्रवृत्तीच्या अमाप पैसा असणाऱ्यांवर पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने काही पोलीस अधिकारी चे हात यात गुंतले तर नाही ना अशी शंका महिलांनी प्रतिनिधी समोर व्यक्त केली एवढेच नाही तर काही पोलीस अधिकारी, पोलीस आमचं काहीच वाकड करू शकत नाही, काय करायचं आहे ते करा कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत जा अशा धमक्या देत मुजोरी करीत आहे, एवढेच नव्हे तर हे लोक आम्हास बदनाम करून मारण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे या दारू विक्रेत्यांपासून आमच्या जीवात धोका निर्माण झाल्याने या अवैध दारू विक्रेत्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून शहरातील, ग्रामीण भागातील विक्री बंद करावी अन्यथा आपल्या पोलीस विभागाकडूनच अधिकाऱ्याकडूनच या अवैध धंदे,कामे करणाऱ्या लोकांना संरक्षण मिळत आहे असे गृहीत धरून पोलीस प्रशासना विरोधात पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असेही महिलांनी निवेदन देत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.