मुल तालुक्यात युरीयाचा तुटवडा | Batmi Express

Mul,Mul News,agriculture,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,

Mul,Mul News,agriculture,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,

मुल: शेतकरी बांधवांना आता विविध पीकांवर या मोसमात युरीया खताची गरज असताना, युरीया बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांना इकडे तिकडे भटकावे लागत आहे. खत विक्रेते महाग खते घेण्यास भाग पाडत असल्याचे दिसून येत आहे, गरज नसताना महाग खते विकत घ्यावे लागत आहे, शेतकरी बांधवांची लुट केल्या जात आहे.

मात्र जिल्ह्यातील आमदार, मंत्री आरक्षण, कंत्राटी नोकर भरती या वर मनोरंजनाचे चर्चा करण्यात रंगले आहेत, जनतेचे मूलभूत समस्या वरून लक्ष विचलित करण्या साठी नविन नविन मुदे उकरून काढत ,सता परिवर्तन, अशा मनोरंजन गोष्टी कडे जनतेला आकर्षीत करण्यात नेते व कार्यकर्ते यशस्वी होत आहेत 

सामान्य नागरिकांनी आता राजकारणा सारख्या मनोरंजन मुद्या कडे आपले लक्ष केंद्रित न करता आपल्या जीवनाशी निगडित मुदयावर  चर्चा करून निर्णय घेणे गरजेचे आहे 

कुणी येईल आणि आमच्या समस्या सोडवतील हा मनातील समज काढून टाकावा, अशी नवी चर्चा जनतेत सुरू आहे.


प्रकाशक नाव: साजन लेनगुरे

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.