बल्लारपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात दोन नराधमाने एक अल्पवयीन मुलीवर जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. ( Chandrapur Torture )
जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार :घरी सोडून देण्याच्या बहाण्याने थेट जंगलात नेऊन एका अल्पवयीन मुलीवर 2 नराधमाने आळीपाळीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बल्लारपूर तालुक्यातील कळमना जंगल परिसरात 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक आरोपी अटकेत एक फरार :जंगलात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी तिरुपती पोलादवार वय 22 वर्ष, रा. मुलचेरा, ता. गडचिरोली याचावर भा. द. वि. 376, 376 ब व पोस्को 4, 6 कलम लाउन बेड्या ठोकल्या आहे. तर दुसरा आरोपी मोरेश्वर जंपलवार रा. केळझर, ता. राजुरा हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.
अटकेतील आरोपीला 3 दिवसांची पोलिस कोठडी :बल्लारपूर पोलिसांनी नराधम आरोपी तिरुपती पोलादवार यांना बल्लारपुर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधीकारी दीपक साखरे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्राची राजुरकर व त्यांची टीम करीत आहे.
नोट: बातमी एक्सप्रेस पब्लिकेशन हाऊस बलात्कार किव्हा अन्य अत्याचार बातमी लेखनात अल्पवयीन मुलगी किव्हा महिलेचा नाव प्रकाशित करीत नाहीत.