आरमोरी: वैनगंगा नदीच्या पात्रात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह | Batmi Express

Pawani,Gadchiroli Live News,Gadchiroli,Armori Suicide,Gadchiroli Suicide,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,Bhandara,

Pawani,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Armori Suicide,Gadchiroli Suicide,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,Bhandara,

आरमोरी
: सूत्रांकडून मिळालेल्या ताजी माहितीनुसार आरमोरी तालुका पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये तरंगताना कुजलेल्या अवस्थेमध्ये महिलेचे प्रेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.

 अरसोडा येथील शेतकरी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यापैकी शेतकरी शालिक पत्रे त्यांना नदीपात्रात तरंगताना कुजलेल्या   अवस्थेमध्ये एक मृतदेह आढळून आले. तात्काळ शालिक पत्रे यांनी आरमोरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आरमोरी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन प्रेताच्या पंचनामा करून प्रेत ताब्यात घेतला सदर महिलेच्या कानामध्ये बिऱ्या घातलेल्या आहेत. आणि तिच्या ब्लाउज मधून कापडी रंगाची लालसर एक कापडी पर्स मिळालेली आहे. त्या पर्समध्ये एक बसची टिकीट मिळाली असून त्या तिकिटावर पवनी असा उल्लेख असल्याने यावरून सदर महिला ही पवनी परिसरातील असावी असा अंदाज वर्तवीण्यात येत आहे .सदर घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप मांडलीक करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.