'
30 seconds remaining
Skip Ad >

Nagpur MCA Student Suicide: पेपरच्या अभ्यासाचा घेतला टेन्शन; एमसीएच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या | Batmi Express

0

Nagpur Live News,Nagpur Suicide,Nagpur LIve,nagpur news,suicide news,suicide,Nagpur,Nagpur Today,
नागपूर:- नागपुरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पेपरचा अभ्यास झाला नसल्याच्या तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या केली.अभ्यास न झाल्यामुळे उद्याच्या पेपरमध्ये काय लिहिलणार; या टेन्शनमुळे एमसीएच्या विद्यार्थ्याने रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Nagpur MCA Student Suicide)

ही घटना मानकापूर येथील गोधनी रेल्वेलाईनवर काल बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.यश माने अस मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो एमसीएचा विद्यार्थी होता. तो व्हीएमव्ही महाविद्यालयात एमसीएच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,यशचा बुधवारी सकाळी एमसीएचा पेपर होता.मात्र,रात्री बारा वाजताच्या सुमारास तो घरातून कुणालाही न सांगता निघून गेला.यश रात्री घरून निघून गेल्यावर कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो कुठेही सापडला नसल्याने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी नातेवाईक गेले असता रेल्वेखाली उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.दुर्दैवाने तो तरुण यशच होता.यशचा मोठा भाऊ अतुल आयटी कंपनीत नोकरीला असून, वडील प्रकाश माने सुरक्षारक्षक आहेत.यशच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली असून,याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×