मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. त्याचा कधी थेट तर कधी नकळत परिणाम कच्चा तेलावर होत आहे. जगभरात आर्थिक मंदीचे सावट आहे.
कच्च्या तेलात गेल्या एक महिन्यात मंदी दिसून आली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $८५.९१ वर पोहोचला आहे. तर WTI प्रति बॅरल $८०.२६ वर जाऊन पोहोचला आहे. नेहमीप्रमाणे १ जानेवारीला सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे दिसून आले आहे.
आज भारतातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाले आहे. केरळमध्ये पेट्रोल ०.७२ रुपयांनी वाढल्यानंतर १०२.६३ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी डिझेलचा दर ०.६७ रुपयांनी वाढून ९५.४४ रुपये प्रति लिटर झाला आहे. याशिवाय पंजाबमध्ये पेट्रोल ९६.८९ रुपये (०.२९ ची वाढ) आणि डिझेल ८७.२४ रुपये (०.२८) ची वाढ झाली आहे आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोव्यासह इतर काही राज्यांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये इंधनाचे दर कमी झाले आहेत.
देशातील प्रमुख शहरातील तेलाचे दर
दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर, मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर, चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर या शहरांमध्ये लागू होतील नवीन दर नोएडामध्ये पेट्रोल ९६.५९ रुपये आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये ९६.५८ रुपये आणि डिझेल ८९.७५ रुपये प्रति लिटर, लखनौमध्ये पेट्रोल ९६.३३ रुपये आणि डिझेल ८९.५३ रुपये प्रति लिटर झाले आहे. पटणामध्ये पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर झाले आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ७४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर झाले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.