'
30 seconds remaining
Skip Ad >

ॲड. विठ्ठलराव बनपूरकर महाविद्यालयाच्या खेळाडूची गोंडवाना विद्यापीठाच्या खो-खो पुरूष संघात निवड | Batmi Express

0


एजाज पठाण, मालेवाडा -  
ॲड. विठ्ठलराव बनपूरकर मेमोरियल कला व वाणिज्य महाविद्यालय मालेवाडा येथील खो-खो खेळाडूची निवड गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या खो-खो (पुरूष) संघात झाली आहेत.

महाविद्यालयाच्या खेळाडू श्री. योगेश अंतराम पुडो (बी.कॉम.-2) याची निवड पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेसाठी झालेली असून हा संघ बासवाडा, राजस्थान येथील गोविंद गुरु ट्राबल विद्यापीठ येथे दिनांक 03 जानेवारी ते 07 जानेवारी 2023 या कालावधीत महाविद्यालयाच्या खेळाडू विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.

तसेच नुकत्याच झालेला अश्वमेध क्रीडा महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथे दिनांक 03 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2022 या कालावधीत गोंडवाना विद्यापीठ तर्फे खो-खो संघामध्ये प्रतिनिधित्व केलेले आहेत.

या खेळाडूंनी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. प्रकाश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खो च्या नेहमी सराव करून यश प्राप्त केले या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आई-वडील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. कामडी सर त्याचप्रमाणे संस्थेच्या अध्यक्षा रेखाताई बनपुरकर व संस्थेचे सचिव श्री. सारंगजी बनपूरकर, डॉ. मनोज अरमरकर, डॉ.अनिता लोखंडे व महाविद्यालय प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले.

महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूला भविष्याच्या पुढील वाटचाली त्याकरिता हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×