कोरची येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती थाटात साजरी | Batmi Express

Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Bus,Korchi,Gadchiroli Batmya,

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Bus,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची तालुका प्रतिनिधी - 
दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी माळी समाज कोरचीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती संपूर्ण गाव सफाई करून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मानसी वाढई, प्रस्ताविक राकेश मोहूर्ले, तर आभार कल्याणी शेंडे यांनी मानले.  याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षलताताई भैसारे नगराध्यक्षा कोरची, उदघाटक देवाजी मोहूर्ले माळी समाज कार्यकर्ते, प्रमुख मार्गदर्शक रमेश नान्हे सर माँसाहेब आश्रम शाळा कोटरा, सी.बी. अंबादे सर जी.प.शाळा पांढरीगोटा, सत्कारमूर्ती कु. त्रिवेणी गायकवाड (प्राथमिक शिक्षिका), कु. आसावरी शेंडगे (P.S.I.), श्री. नंदकिशोर गोबाडे (माध्यमिक शिक्षक), श्री. ओमदेव आदे (पदवीधर शिक्षक) व विजय कावडे माळी समाज कार्यकर्ते यांचे माळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आले. प्रमुख पाहुणे मनोजभाऊ अग्रवाल ,तेजस्विनी टेंभुर्णे नगरसेवक, धनराज मडावी, दिलीप मडावी, विठ्ठल गुरनुले , शालिकराम कराडे सर, रुखमोडे सर, चेतन कराडे (रायुकॉं) कोरची, डॉ. स्वप्नील राऊत, आनंदराव मेश्राम साहेब, वासीमभाई शेख, चतुर सिंद्राम माजीसैनिक कोरची, गौरव कावडे सर प्राथ. शिक्षक टहाकाटोला, निळताई किलनाके व्यसनमुक्ती अध्यक्ष, राहुल अंबादे लोकमत पत्रकार , आशिष अग्रवाल RTI पत्रकार , जितेंद्र सहारे पत्रकार, नंदकिशोर वैरागडे पत्रकार, प्रा.बांगरे सर, प्रा. दोनाडकर सर, मडावी मॅडम पोलीस शिपाई आदी मान्यवर उपस्थित होते.

          सदर कार्यक्रमात हर्षलता ताई भैसरे यांनी सावित्रीबाई फुलें यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना समाजात स्त्री जीवणाचे महत्व काय हे पटवून दिले. त्याचप्रमाणे सत्कार मुर्ती आशावरी ताई शेडगे पोलीस उपनिरीक्षक यांनी मार्गदर्शनात सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र सांगताना स्त्री जीवन शिक्षण व कायदा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर महात्मा फुले वार्ड ते लुम्बिनी बुद्ध विहार पर्यंत शांतता शोभा यात्रा काढण्यात आली. सायंकाळी महाभोजन कार्यक्रम ठेवले होते. रात्रोला महामानवावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.  माळी समाजातील बालगोपाल  रुचिता मोहूर्ले, शुभम जेंगठे यांनी खूप छान चारोडी च्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचे चित्र मांडले. 

          कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपुर्ण माळी समाजातील महिला वर्ग,पुरुष वर्ग, युवक व युवती यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.