Electricity Workers' Strike: वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू : वरोरा विभागातील ३५० अधिकारी व कर्मचारी सहभागी | Batmi Express

Electricity Workers' Strike,Electricity Workers' Strike News,Electricity Workers' Strike Chandrapur,Warora News,Chandrapur News,Chandrapur,Warora,Chan

Electricity Workers' Strike,Electricity Workers' Strike News,Electricity Workers' Strike Chandrapur,Warora News,Chandrapur News,Chandrapur,Warora,Chandrapur Live,

तालुका प्रतिनिधी / वरोरा :
 महाराष्ट्र वीज वितरण कंपनी नष्ट करण्यासाठी या कंपनीला समांतर अशी अदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज आयोगाकडे समांतर परवानगीसाठी अर्ज केला आहे. सरकारने मंजुरी दिल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नोकरीचा प्रश्न निर्माण होईल वीज वितरण कंपनी फायद्यात असताना ती तोट्यात जाऊन बंद पडू शकते असा आरोप वीज कर्मचाऱ्यांनी करीत चार जानेवारीच्या मध्य रात्रीपासून संप पुकारलेला आहे. विभागीय कार्यालय वरोरा मधील ३५० अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

 वरोरा चिमूर व भद्रावती तालुक्यातील ३५० अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी होऊन वीज वितरण कंपनी वरोराच्या विभागीय कार्यालया समोरील प्रवेश द्वारासमोर घोषणाबाजी करत बसले आहे. अदानी इलेक्ट्रिक कंपनी समांतर वीज पुरवठा करू लागली तर ज्या पद्धतीने शासकीय दूरसंचार विभाग नष्ट झाला तीच वेळ महावितरण वर येऊ शकते असा आरोप संपात सहभागी झालेल्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वरोरा विभागातील वीज कर्मचाऱ्यांचे संपाचे नेतृत्व विनोद कुमार भोयर, प्रफुल लालसरे, संतोष लोहे, अरुण गायकवाड, सचिन डुमरे, अविनाश देवतळे, प्रवीण मल्लेवार, प्रवीण धानोडे, चंद्रकांत नागरकर, जयप्रकाश लोणगाडगे, सुमित पेटकर, देवानंद गायकवाड योगेंद्र मडावी, मोहन शेंडे, रामकृष्ण राजुरकर, नरेंद्र वंजारी, मुरलीधर गायकवाड, सतीश एकरे, आनंदराव टापरे, शुभम लड्डा आदी करीत आहेत. संप ७२ तास चालणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.