पोंभुर्णा:- दिलीप रामचंद्र मोरे, तलाठी, सा. क्र. 3 घोसारी (सा. क्र. 08 पिपरी देशपांडे अतिरिक्त कर्तव्य) तहसील कार्यालय पोंभुर्णा ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर यांना लाचेच्या सापळ्यात अटक करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे तुकुम तह. जि. चंद्रपुर येथील रहीवासी असून सेवानिवृत्त कर्मचारी आहे. तकारदार यांनी व इतर ०२ लोकांनी मिळुन मौजा चकठाणा पो. दिघोरी तह पोभूर्णा जि. चंद्रपुर येथिल सर्वे क्र. ९९ क्षेत्र ४.५८ हे आर. पैकी २.४० हे. आर सामुहिक शेत जमिन विकत घेतली होती. त्या सामुहिक शेत करून वेगळा सातबारा तयार करुन दिल्याचा कामाकरीता व नकाशादुरुस्ती करुन दिलेच्या कामाकरीता दिलीप रामचंद्र मोरे, तलाठी, सा. क्र. ३ घोसरी (सा. क्र. ०८ पिपरी देशपांडे अतिरीक्त कार्यभार) तहसिल कार्यालय पोभुर्णा तह. पोंभुर्णा जि. चंद्रपुर यांनी तक्रारदाराकडे ३,००० /- रु. ची मागणी केल्याचे तक्रार करण्यात आली.
आज दिनांक २८/१२/२०२२ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी व सापळा कार्यवाही दरम्यान दिलीप रामचंद्र मोरे, तलाठी यांनी तक्रारदाराकडे तडजोडअंती २,०००/-रु. लाचेची मागणी करून स्वतः स्विकारल्याने श्री. राजेश्वर गव्हारे, राज राजेश्वर नगर पोभुर्णा यांचे घरी किरायाणे राहत असलेल्या खोलीमध्ये पकडण्यात आले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही श्री. राहुल माकणिकर, पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नागपुर, श्री. मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक, श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि.चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती शिल्पा भरडे, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो.उप.नि. रमेश दुपारे, नापोकॉ. नरेश नन्नावरे, संदेश वाघमारे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, चा.पो.अ. सतिश सिडाम हे सर्व ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे.
यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.