आंबेशिवनी :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल दिनांक 26 डिसेंबर रोजी मौजा आंबेटोला येथील महिला आपल्या शेतामध्ये काम करत असतांना लगतच्या जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जखमी केले होते.
डिसेंबर २७, २०२२
0
वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव मंगला प्रभाकर कोहपरे वय 50 वर्ष राहणार आंबेटोला असे असुन जखमी महिलेला पुढिल उपचार करण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले होते . सदर महीला रुग्णालयात उपचार सुरू असताना काल रात्री 12.55 वाजता निधन झाली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.