धानोरा (वा.) धानोरा मुरूमगाव राष्ट्रीय महामार्गावरील कुसुमटोला गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने दोन दुचाकीस धडक दिल्याने पाच जण जखमी झाल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात चार जणांचे पाय मोडल्याची माहिती आहे. प्रफुल विनोद तुलावी (30) रा. मुरमाडी, गुरुदेव मातलामी (40) रा. धानोरा, देवनाथ हलामी (18) रा. पन्नेमारा, आशिष आतला (17) रा. कुलभट्टी, निखिल पेंदोर (25) रा. मुरमाडी असे अपघात गंभीर जखमी झालेल्यांची नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार येरकड वरून प्रफुल तुलावे आणि गुरुदेव मातला हे दुचाकीने धानोराकडे येत होते, तर धानोरा मार्गे देवनाथ हलामी, आशिष आतला एका दुचाकीने जात होते. दरम्यान येरकड गावापासून अवघ्या काही मीटर अंतरावर देवनाथ हलामी, आशीष आतला यांच्या भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने प्रफुल तुलावे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर पुन्हा सदर दुचाकीने निखील पेंदोर या दुचाकीलाही धडक दिली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.