चंद्रपूर: बस-ट्रकच्या भीषण अपघातात तरुणी जागीच ठार | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Mul,Chandrapur Accident News,Mul Accident,Mul News,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Mul,Chandrapur Accident News,Mul Accident,Mul News,

चंद्रपूर:- 
मुल-चंद्रपूर राष्ट्रीय मार्गावरील तलावाजवळ ट्रक-बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील एक युवती जागीच ठार झाली असून पाच प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (दि.२९) दुपारी घडली. तेजस्विनी नारायण कोडवते (वय २४, रा .एकलपुर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. दरम्यानस ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बस गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे जात होती. याच मार्गावर चंद्रपूरहून मुलकडे एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये युवतीचा जागीच मृत्यू झाला. तर पाच प्रवाशी किरकोळ जखमी आहे.

सदर युवतीचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ही मुल शहरापासून काही अंतरावर घडल्याने तत्काळ मुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.