'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार | Batmi Express

0

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur   News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack

चंद्रपूर
: आज दिनांक ३० डिसेंबर रोजी मौजा इरव्हा येथील महिला आपल्या शेतामध्ये करत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जागीच ठार केले. वाघाच्या हल्ल्यात ठार  झालेल्या महिलेचे नाव नर्मदा भोयर वर्ष राहणार इरव्हा असे आहे. 

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur   News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack

सविस्तर वृतांत - 
नागभीड:- शेतावर गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना नागभीड तालुक्यातील इरव्हा (टेकरी) येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने नागभीड तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

नर्मदा प्रकाश भोयर (५०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. नर्मदा शुक्रवारी सकाळी मुलगा, सून आणि गावातील इतर महिलांसमवेत घरच्या गुरांसाठी गवत आणण्यासाठी शेताकडे गेल्या होत्या. शेताच्या बांधावर गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. यात त्या जागीच गतप्राण झाल्या. काहीवेळाने सून, मुलगा व इतर महिलांनी नर्मदा यांना आवाज दिला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून नर्मदा ज्या ठिकाणी गवत कापत होत्या त्या ठिकाणी जाऊन बघितले असता, वाघ नर्मदाच्या नरडीचा घोट घेत असल्याचे निदर्शनास आले. बघायला गेलेल्यांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला.

दरम्यान, घटनास्थळापासून गाव जवळच असल्याने ही वार्ता लगेच गावात पोहोचली आणि बघ्यांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती नागभीडच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×