SSC - HSC 2023 Exam Dates: दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर | Batmi Express

HSC 2023 Exam News,HSC Exam,Education,SSC 2023 Exam,SSC 2023,HSC 2023 Exam,HSC 2023,SSC 2023 Exam News,CBSE,CBSE Exam,CBSE Exam 2023,CBSE Class 10th E
HSC 2023 Exam News,HSC Exam,Education,SSC 2023 Exam,SSC 2023,HSC 2023 Exam,HSC 2023,SSC 2023 Exam News,CBSE,CBSE Exam,CBSE Exam 2023,CBSE Class 10th Exam 2023,CBSE Class 12th Exam 2023,

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले, त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांचे सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

तसेच छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. 

तसेच सीबीएसई बाेर्डानेही दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान, तर बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर हे वेळापत्रक पाहता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.