तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: तो पुन्हा आला...वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Tiger Attack,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Tiger Attack,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

ब्रम्हपुरी
:- शेतात तुरीच्या शेंगा तोडायला गेलेल्या महिलेवर अचानक वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव बू. येथे आज दुपारी  ४.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने ब्रम्हपुरी तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव सिताबाई सलामे ( वय -६० ) असं आहे. सिताबाई आज दुपारी तुरी च्या शेंगा  तोडण्यासाठी शेताकडे गेली होती. शेताच्या बांधावर तूर तोडत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. यात त्या जागीच गतप्राण झाल्या. काहीवेळाणी महिलांनी सिताबाई यांना आवाज दिला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सिताबाई ज्या ठिकाणी तुरीच्या शेंगा तोडत होती त्या ठिकाणी जाऊन बघितले असता, वाघ सिताबाईच्या नरडीचा घोट घेत असल्याचे निदर्शनास आले. बघायला गेलेल्यांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला.

दरम्यान, घटना स्थळापासून गाव जवळच असल्याने ही वार्ता लगेच गावात पोहोचली आणि बघण्यार्यांनी गर्दी केली. घटनेची माहिती ब्रम्हपुरीच्या वनपरिक्षेत्र कार्यालयास देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला जात आहे. मृतदेह उचलण्यास गावातील जनतेचा नकार आहे ? यावेळी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. गावातील जनतेमध्ये क्रोधाचे वातारण निर्माण झाले आहे. 

कारण  वारनवार वणप्राण्याचे मानवा वरील हल्ले वाढतच चालले असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी अश्या नरभक्षक वाघाला त्वरित पकडुन बंदिस्त करा अशी मागणी ग्रामस्थांनी व गावातील नागरिकांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.