कोरची:- छत्तीसगड राज्याचे संसदीय सचिव तथा आमदार विधानसभा क्षेत्र मोहला-मानपुर इंद्रशाहजी मडावी आपल्या विधानसभा क्षेत्रात ग्रामपंचायत टाटेकसा या ठिकाणी दौऱ्यावर आले असताना कोरची तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतिनिधी मंडळ त्यांची भेट घेऊन कोरची तालुक्यातील छत्तीसगड व महाराष्ट्राला जोडणारा रस्ता व पूल तसेच विकास कामासबंधी सविस्तर चर्चा केली. माननीय मंत्री महोदयांनी कोरची तालुक्यातील छत्तीसगड व महाराष्ट्राला जोडणारा रस्ता व पुलाचे काम प्राधान्याने करणार असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष विनोदकुमार कोरेटी तसेच मोहला पंचायत समितीचे सभापती लगनुराम कार्यपाल, टाटेकसा ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश कोमरे, बिचारपूर ग्रामपंचायतीचे सरपंच निजामसाय काटेंगे, प्राध्यापक संतराम धीकोडी हे उपस्थित होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.