गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या दामरंचा परिसरात छतीसगड आणि गडचिरोली पोलीस दलाच्या सी. ६० कमांडोने संयुक्त रित्या नक्षल विरोधी मोहीम राबवितांना दोन जहाल नक्षल्यांचा खात्मा झाला आहे .
सविस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या दामरंचा परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याचे गुप्त माहितीच्या आधारे छत्तीसगढ पोलीस आणि गडचिरोली पोलीस दलाच्या सी – ६० कमांडोंनी संयुक्त रित्या नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधूंन गोळीबार केली त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी देखील गोळीबार केला . पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल जंगलाच्या दिशेने पडून गेले . चकमक संपल्यावर जंगलपरिसरात शोध मोहीम राबविले असता दोन नक्षल्यांचा मृतदेह आढळून आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी बोलतांना दिली.