मुंबई:- शहर परत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादळल आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डिसेंबर २५, २०२२
0
मुंबईत महिला अत्याचाराच्या घटनेत कमालीची वाढ झाल्याचे चित्र मागील अनेक दिवसा पासून समोर येणाऱ्या घटने मधून दिसून येत आहे त्यात परत एकदा मुंबईतील लोअर परेल परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीला तिचाच मित्र त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला होता, त्या मित्राचा घरी सहाही नराधमांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेतील तीन आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी एन एम जोशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
काय आहे घटना?
पिढीत अल्पवयीन मुलीचा अल्पवयीन आरोपींपैकी एक जण चांगल्या मित्रांपैकी एक आहे. 23 डिसेंबर रोजी तो पिढीत मुलीला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला, जिथे सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणाचा तपास एन एम जोशी पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असं मुंबई पोलिसांच्या वतीने सांगितण्यात आलं.
तीन अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात
एन एम जोशी मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 (डी) (2) (एन), 34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 5, 6, 8, 10, 12, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपींची अधिक चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींपैकी तीन आरोपी प्रौढ आहेत. या आरोपींनी याआधीही अशाप्रकारचं कृत्य केलं आहे, याचा तपासही पोलीस करत आहेत. शिवाय त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचाही शोध घेतला जात आहे. तर तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी डोंगरी भागातील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.