'

गोवर आजार निर्मूलनावर कोरची तहसीलच्या कार्यालयात चर्चा, तालुका टास्क फोर्स समितीची सभा | Batmi Express

0

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची
: कोरचीचे तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली कोरची तहसीलदार कार्यालयात गोवर,रूबेला आजार निर्मूलनावर तालुका टास्क फोर्स समितीची सभा ८ डिसेंबर रोजी पार पडली.

कोरची तालुक्यातील ९ महिने ते ५ वर्षे बालकांचे आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्यामार्फत सर्वेक्षण करणे, गोवर, रूबेला लसीकरण सुटलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे. सूक्ष्मकृती आराखडा तयार करून ९ महिने ते ५ वर्ष वयोगटात लसीकरण वंचित बालकांना शंभर टक्के लसीकरण करणे, नगरपंचायत अंतर्गत कोरची शहरात घंटागाडी द्वारे प्रसिद्ध करणे, शाळेमध्ये पोस्टर, बॅनर द्वारे जागृती करणे, तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसायी यांनी संशयित रुग्ण आढळल्यास शासकीय कार्यालयास अहवाल पाठवण्यास सहकार्य करणे, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर, रूबेला आजार निर्मूलन करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

सदर सभेला समितीमधील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, तहसीलदार सोमनाथ माळी, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक अभय थुल, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम वायाड, आरोग्य विस्तार अधिकारी दोडके, एकात्मिक प्रकल्प विस्तार अधिकारी दोनाडकर, गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्ने, स्वयंसेवी प्रतिनिधी विकास लाडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×