'
30 seconds remaining
Skip Ad >

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार | Batmi Express

0
Sawali,Tiger Attack,Sawali News,Chandrapur Tiger Attack,

सावली : तालुक्यातील निलसनी पेठगाव येथील शेतात गेलेला शेतकरी वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. कैलास लक्ष्मण गेडेकर (४७) असे मृतकाचे नाव असून निलसनी पेठगाव येथील रहिवासी आहे.

सावली वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या उपवन क्षेत्र व्याहाळ खुर्द परिसरातील निलसनी पेठगाव येथील कक्ष क्र. २०१ हे शेत जमीनी लगतचे क्षेत्र असून, या भागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचे वावर आहे. दिवस हे धानपिकाच्या कापनी बांधणीचे असल्याने अनेक शेतकरी परिवारासह शेतात काम करताना दिसतात किंवा जंगल परिसरात सरपणासाठी जात असतात. या भागातील अनेक शेत जमीनी, झुडपी जंगल व्याप्त असून नेहमीच या भागात वन्य जीवांचा धोका असतो. तरीही शेतकरी आपला जीव मुठित घेऊन शेतशिवाराचे कामे करताना दिसतात. घटनेच्या दिवशी मृतक शेतात गेला होता, परंतु उशिरा प्रयत्न घरी न परतल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाले, पण शोध लागला नाही.

सदर घटनेच्या दुसऱ्या दिवशी शेतालगत असलेल्या वनात त्याचा शोध घेतले. सरपटत गेल्याच्या खुना जानवल्याने त्याचदिशेने शोध घेतले असता, मृतकाचे शव निदर्शनाश आले. वाघाने मृतकाच्या शरीराचे अर्धे अधिक शरीर फस्त करुण केवळ धळ शिलक ठेवले होते. शेतशिवारा लगत जंगल असल्याने मृतक शेतालगत कक्ष क्र. २०१ या भागात गेला होता. त्यामुळे जंगल परिसरातील झुडपात दब्बा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करुण मृतकास फरकळत नेऊन ठार केले, सदर घटना मंगळवारला दुपारी २ वाजताची असून, दुसऱ्या दिवशी शोध मोहिम दरम्यान वाघाच्या हल्यात शेतकरी ठार झाल्याचे निदर्शनात आले. परिसरात वाघाच्या हल्यात शेतकरी ठार झाल्याची कल्पना होताच वन अधिकारी घटनास्थळी धावून आले.

पंचनामा करुण मृतकाच्या उच्च स्तरीय तपासणीसाठी पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. मृतकाच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा आप्त परिवार असून मृतकाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भागात वन्य जीवांची मोठी दहशत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात आजपर्यंत मानवावर तीन हल्ले झाले आहेत. सोनापुर, उपरी आणि आता निलसनी पेडगांव येथे अशा घटना घडल्या असून, दोघांना गंभीर जखमी केले होते. तर या घटनेत वाघाने बळी घेतल्याची घटना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×