दुचाकी अनियंत्रित होऊन दोन तरूण गंभीर जखमी | Batmi Express

Be
0

Gadchiroli Accident,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli Accident News,Kurkheda News,kurkheda,Gadchiroli Batmya,

कूरखेडा
- कढोली मार्गावरील गांगोली वळणावर दुचाकी अनियंत्रित होत रस्त्याच्या खाली उतरत लोखंडी जाहीरात बोर्डाला धडकल्याने दोन यूवक गंभीर जखमी झाल्याची घटणा आज दि ९ डिसेंबर शूक्रवार रोजी दूपारी ११ वाजेचा सुमारास घडली. अपघातात ओमकार गजानन भोयर (२२) रा कढोली व रोहन प्रेमदास राऊत (२२) रा खरकाळा हे दोघे वर्ग मित्र गंभीर जखमी झाले.

ते दोघेही आज दुचाकी क्र एम एच ३४ ए डी 0496 या वाहनाने खरखाडा येथून कढोली कडे जात होते दरम्यान गांगोली वळणावर त्यांची दुचाकी अनियंत्रित होत रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी जाहीरात बोर्डाला धडकली धडक एवढी जबरदस्त होती की लोखंडी एंगलचा बोर्ड तूटून जमीनीवर पडला या अपघातात दोन्ही यूवकांचा डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याना लगेच खाजगी वाहनाने कूरखेडा उपजिल्हा रुग्नालयात नेण्यात आले मात्र भोयर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला ब्रम्हपूरी येथील खाजगी रुग्नालयात हलविण्यात आले आहे यावेळी विषेश म्हणजे दोन्ही यूवक हेलमेट घालून नव्हते हेलमेट असता तर कदाचीत त्यांचा डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीतून त्यांचे संरक्षण झाले असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->