चंद्रपूर: शेतात विद्युत करंट लागून सरपंचाचा जागीच मृत्यू | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Sawali,Chandrapur Live,Chandrapur Today,Sawali News,

चंद्रपूर: सावली तालुक्यातील बेलगाव येथील सरपंच अंबादास पाल यांच्या शेतात विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटनेने खळबळ माजली असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहे. 

सावली तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी तथा सरपंच अंबादासजी पाल हे नित्यनिमाप्रमाणे आज सकाळी आपल्या शेतात धानपिके पाहण्यासाठी गेले असतानाच त्या ठिकाणी इलेक्ट्रिक तार पडून होता आणि त्यात त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला.

सदर घटनेची माहिती गावात होताच गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली पोलीस हे घटनास्थळी पोहोचले असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. अंबादास पाल यांच्या मृत्यूने परिसरात मात्र शोककळा पसरलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.