'
30 seconds remaining
Skip Ad >

कोरची: वनश्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन | BatmiExpress™

0

Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची
:- कोरची शहरातील अंतर्गत रस्त्यासह राज्य महामार्गाची मागील अनेक दिवसापासून बकाल अवस्था झाली असल्याने  बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र रस्ता दुरुस्तीसाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने कोरची येथील वनश्री महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी थेट तहसीलदारांकडे समस्या मांडलीव रस्ता दुरुस्तीची मागणी लावून धरली. कोरची तालुक्यातीलरस्त्यांची सध्या फारच दयनीय अवस्था झालेली आहे. शिक्षणासाठी बाहेर गावावरून सायकलने कोरची शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सदर रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असताना एखादी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की रस्त्यावर खूप मोठे मोठे भगदाड पडलेले असून,  सदर रस्त्यावर एखादी अपघात झाल्यास  जबाबदार कोण असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे.

पावसाळ्यापूर्वी रस्त्याची अवस्था गंभीर असताना दुरुस्ती करण्याकडे संबंधित विभागाने कानाडोळा केले आहे. यामुळे त्रस्त वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीरस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठीथेट तहसील कार्यालय गाठूनतहसीलदार पुढे समस्या मांडली. तत्काळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी विद्यार्थी अंकित नंदेश्वर,  राहुल भन्नारे ,विकास देवांगन,  सुशांत नंदेश्वर ,अनिकेत सहारे,  मायकल कराडे ,अरबाज जडिया,  आदित्य  कोवाची,  आदेश राऊत ,किरण हलामी ,नंदिनी सहारे,  पल्लवी नुरुटी,  रूपाली कलारी यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×