मुलचेरा - तालुका प्रतिनिधी / संदीप जोरगेवार: मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा गावाजवळ आज सकाळच्या सुमारास अहेरी लगाम मुलचेरा जाणारी एमएच-07 सी 9465 क्रमांकाची एसटी बस लगाम परिसरातील शांतिग्राम, लगाम, कोलपल्ली, कोठारी, मल्लेरा येथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना चाची नाल्याजवळ अपघात झाला. या बसमध्ये जवळपास 20 ते 25 शालेय विद्यार्थी असल्याची माहिती आहे. मल्लेरा गाव ओलांडल्यानंतर चाची नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला थेट जंगलात जाऊन झाडाला आडळली. या अपघातात वाहन चालक आणि वाहक तसेच काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व जखमींना मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे त्यातच अहेरी आगारातुन शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी सोडले जाणारे अनेक बसचे तीन-तेरा वाजले आहे.
रस्त्यावरच बिघाड होणे, धावत्या बसचे पार्ट निघून जाणे, कधी डिझेल संपणे आणि अपघात होणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एसटी बसचा प्रवास आता धोक्याचा ठरत आहे.नेमका हा अपघात कसा झाला याची अधिकृत माहिती नसलेतरी शालेय विद्यार्थ्यांना मात्र धोक्याचा प्रवास करावा लागत असल्याची बाब समोर येत आहे. अगोदरच अहेरी उपविभागातील बकाल रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. नियमित बस सेवा नसल्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांना शाळेला मुकावे लागत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.