कोरची - दरवर्षी कोरची येथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे जन्माष्टमी उत्सव नागरिकांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आले नव्हते. या वर्षी 19 तारखेला बाजार चौक कोरची येथे श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये रात्री सात ते आठ पर्यंत भजन मंडळी ने भजनाची प्रस्तुती केली.
नंतर 20 ऑगस्टला सकाळी श्रीकृष्णाची आरती करण्यात आली. पूजन हवन करून दुपारी दहीहंडी चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामध्ये कोरची येथील युवकांनी हंडी फोडून प्रथम येण्याचा मान पटकाविला. प्रथम येणाऱ्या चमूला वडीकर ज्वेलर्स तर्फे पारितोषिक देण्यात आले. संध्याकाळी महाप्रसादाचे कार्यक्रम करून संपूर्ण शहरात प्रभातफेरी काढण्यात आली ज्यामध्ये कोरची शहर व परिसरातील नागरिक हे मोठ्या संख्येने डी जे च्या तालावर नृत्य करतानी दिसून आले. तसेच राउत नाच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जे शहराच्या लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत होते रात्रि नाचत गात श्रीकृष्णाच्या मूर्तिचे विसर्जन करण्यात आले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.