Corona Update Maharastra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1081 कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे एकाही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. महाराष्ट्रातील प्रकरणांमध्ये वाढ होत असताना मुंबईत 739 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. तेची बाब म्हणजे राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत असून, ही संख्या 2970 आहे. त्याखालोखाल ठाण्यात 452, पुण्यात 357 रुग्ण उपचाराधीन आहेत. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. (Corona Outbreak Maharastra )
महाराष्ट्रात कोरोना आकडेवारी | महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट:
- 30 मे → 441
- 31 मे → 711
- 31 जून → 1081
- 30 मे → 318
- 31 मे → 506
- 31 जून → 739
कोरोना टास्क फोर्सच्या गाईडलाईन्स:
- कोविड चाचण्या वाढवा - टेस्टिंग लॅब सुस्सज ठेवा
- १२ ते १८ वयोगटातील व्यापक लसीकरण मोहीम राबवा
- बुस्टर डोस सक्तीचा करावा
- जम्बो हॉस्पिटल तयार ठेवा पुरेसा स्टाफ नियुक्त करा
- वार्ड स्तरावर पुन्हा कोरोना वॉर रम उभारा
- वॉर्डनिहाय कोरोना रुग्णाचा दैनंदिन आढावा घ्या
- मालाडचं जम्बो कोव्हीड सेंटर हॉस्पिटल तयार ठेवा