जून ०१, २०२२
0
तालुक्यातील मरपल्ली येथील पोलीस मदत केंद्रात कर्तव्यावर असलेल्या दोन SRPF जवानांनी वैयक्तिक वादातून एकमेकांवर गोळ्या झाडल्याची घटना दिनांक 1 जून बुधवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी मृत जवानांची नावे आहे.हे दोघेही दौड पुणे येथील SRPF कॅम्पचे जवान होते.
घटनेची माहिती कळताच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या दोन जवानांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.घटनेचा पुढील तपास जिमलगटा येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.