India Corona Outbreak: देशात पुन्हा कोरोनाचा संकट! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 हजारहुन अधिक नवे रुग्ण, 5 रुग्णाचा मृत्यू | Batmi Express

India Corona Outbreak,Coronavirus Live Updates,Delhi,Covid-19,Coronavirus Live,News India,coronavirus,India’s Fight Against COVID-19,Maharashtra

India Corona Outbreak,Coronavirus Live Updates,Delhi,Covid-19,Coronavirus Live,News India,coronavirus,India’s Fight Against COVID-19,Maharashtra

Coronavirus Live Updates:
 देशात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत एकाच वेळी कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 35 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.  ( Coronavirus Live Updates Maharastra 1 june ) 

देशात  गेल्या 24 तासांत एकूण 3,712 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19,509 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात 1123 लोकांनी कोरोनावर मात केली असून, त्यामुळे देशातील त्यांची संख्या 4,26,20,394 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासांत 12,44,298 लोकांना लस देण्यात आली असून, देशातील लसीकरणांची संख्या 1,93,70,51,104 वर पोहोचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.