'
30 seconds remaining
Skip Ad >

Aurangabad University Exam: परीक्षेचे वाजले तीनतेरा, एकाच बेंचवर तीन-तीन विद्यार्थी | Batmi Express

0

Aurangabad,Aurangabad university exam,Aurangabad university,Aurangabad Live,Aurangabad News,Aurangabad Today,Education,Exam

औरंगाबाद :  Aurangabad university exam :
परीक्षेच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादमध्ये विद्यापीठाच्या परीक्षांचा मोठा गोंधळाच चित्र दिसून आला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर विद्यापीठ प्रशासनाने सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन केले आहे. परंतु दोन वर्षाच्या अंतराने केलेल्या या नियोजनात अनेक त्रुटी आढळून आल्याचे दिसून येत आहे. 

औरंगाबादमध्ये विद्यापीठाच्या परीक्षांचा गोंधळ झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेचे नियोजनं फसल्याने विद्यार्थांचे हाल झालेत बेहाल . विशेष बाब म्हणजे एकाच बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ आल्याने परीक्षेचे तीनतेरा वाजलेत. हा सगळा प्रकार विजयेंद्र काबरा समाजकार्य कॉलेजमधील घडला. त्यामुळे पालकवर्गातूनही संताप व्यक्त होत आहे.

आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. ऐनवेळी विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची संख्या शेकडोंनी वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, तसेच परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला आल्यामुळे एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थी बसविण्याची वेळ परीक्षा केंद्र संचालकांवर आली.

उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली दखल

सकाळी नऊ वाजता सुरू होणारा पेपर बारा वाजेपर्यंत सुरू झालेला नाही. मात्र यातून मार्ग काढू, तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.

तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तातडीने दखल घेतली. चौकशी करून तासाभरात कारवाई करु असे उदय सामंत यांनी आश्वासन दिले. 

Sources & Credit: विशाल करोळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×