सविस्तर वृत्त असे की, गोंडपिपरी तालुक्यातील रहिवासी सारंग मोरेश्वर येलमुले यांनी चंद्रपूर शहरातील नगीना बाग जवळ किरायाने रुम करुन राहत होता. सारंग हा स्पर्धापरीक्षेची तयारी करत होता. आज दि. १४ जुन ला सायंकाळी ६ तेे ७ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येच कारण अद्याप पर्यंत कळू शकले नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.