Chandrapur Accident: पेपरला जात असताना दोन मैत्रिणीचा अपघातात जागीच मृत्यू - Be Media

Chandrapur,Rajura,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur Live,Chandrapur News,Accident,Accident News,Accident News Live,Maharashtra,
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Accident,Accident,Chandrapur Live,Accident News,Maharashtra,Chandrapur Accident News,Accident News Live,Rajura,

राजुरा
:- पेपरची तयारी करून दुपार पाळीत असलेल्या बी. ए. प्रथम वर्षाच्या पेपरला छगुणा भिवसन झाडे (वय २०) व अंजली नंदलाल मेश्राम (वय २०) दोन्ही मैत्रिनी राजुरा येथील शिवाजी महाविद्यालय येथे १:३० वाजता असलेल्या पेपरला आपल्या स्कुटीने जात असताना दुपारी एक वाजताच्या दरम्यान राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी- खमोना दरम्यान गडचांदूर मार्गे जात असलेल्या मोटारसाईकल ने धडक दिल्याने दोघीही रस्त्यावर पडल्या यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघीचाही जाग्यावर दुर्दैवी मृत्यू झाला.
निंबाळा येथील छगुणा व अंजली या दोघी पूर्वी पासून मैत्रीनि होत्या. दोघीही चिंचोली (खु) येथील छत्रपती शिवाजी महाराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षाला शिकत होत्या. यावर्षी चिंचोली (खु) महाविद्यालयाचे उन्हाळी परीक्षा केंद्र राजुरा येथील शिवाजी महाविद्यालय असल्याने दोन्ही मुली नुकत्याच सुरू झालेल्या उन्हाळी परीक्षा कला शाखेच्या प्रथव वर्ष दुसऱ्या सेमिस्टरचा समाजशास्त्र विषयाचा पेपर देण्यासाठी छगुणा स्वतःच्या वाहनाने अंजलीला घरून निंबाळा येथून पेपरसाठी निघाल्या मात्र नियतीला ते मान्य नसल्याने पंधरा किमी अंतरावर गेल्या असता समोरून भरधाव येणाऱ्या एका मोटारसाईकलने धडक दिल्याने दोघीही डोक्यावर पडल्या यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे दोघीचाही जाग्यावर दुर्दैवी मृत्यू झाला.

सदर घटना रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना दिसली असता पोलिसांना माहिती मिळताच राजुरा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादूरे आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहचले. दोन्हीही मृत्यदेह ताब्यात घेत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे उत्तरीय तापसणीकरिता नेण्यात आले. घटनेची माहिती गावात पसरताच संपूर्ण गाव शोकाकुल झाला असून समोरील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

 परीक्षा केंद्र तालुक्याच्या ठिकाणी असल्याने ग्रामीण भागातील मुलांना परीक्षा देण्यासाठी राजुरा येथे यावे लागत आहे. राजुरा जाण्यासाठी बस नसल्याने व वेळेवर खाजगी वाहन मिळत नसल्याने स्वतःच्या वाहनाचा वापर करून परीक्षा केंद्रावर जावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेकदा जवळ परिक्षा केंद्र देण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.