#Exclusive ब्रम्हपुरी: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.! दोन दिवसातील दुसरी घटना | Be Media

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Tiger Attack,Bramhapuri News,Chandrapur Tiger Attack,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Tiger Attack,Bramhapuri News,Chandrapur Tiger Attack,

ब्रम्हपुरी
:- तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक:- १४/६/२०२२ ला नुकतीच घडली आहे. देवीदास परसराम कांबळी ( वय वर्षे ४८ ) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून हळदा येथील रहिवाशी आहे.

मृतक देवीदास हा शेतावर शेतीची कामे करण्यासाठी गेला असता बांधाआड दबा धरून बसलेल्या वाघाने देवीदास वर हल्ला चढविला चढविला नंतर देवीदास सोबत सहारे नामक इसम होता यानी देविदास ला वाघाच्या तावडीतून सोडविण्याच प्रयत्न केला मात्र देविदासला सोडला नाही आणि काही वेळातच देवीदासची प्राणज्योत मालवली. तिथेच थांबला नाही तर देविदास सोबत असलेल्या सहारे नामक इसमावर सुद्धा हल्ला चढविला मात्र वाघाच्या तावडीतून कसा बसा पळ काढला. नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला.
दोन दिवसाअगोदर राजेंद्र अर्जून कांबळी ला सुध्दा वाघाने ठार केला होता. म्हणजे दोन दोन दिवसा आड दोन घटना वाघांच्या  हल्यात ठार झाल्याच्या घडल्या आहेत.

मृतक देवीदास च्या पच्छात्य पत्नी , मुलगा सून व नातवंड  असा आप्त परीवार आहे.
घरचा कर्ता पुरुष गेल्याने कांबळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कांबळी कुटुंबं व गावपरिसर शोकसागरात बुडालेला आहे.
 
काही दिवसातच पावसाळा सुरु होत असून शेती कामाला सुरुवात होत आहे आण अशातच वाघाचे वाढते प्रस्त बघत शेती करावे की उपाशी राहावे असा गंभीर प्रश्न गावापरिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.
दिवसागणिक वाघाचे  हल्ला वाढतं असल्यामुळें वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबंधीत वनविभागानी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हळदा येथील व  गावपरिसरातील नागरिकांनी  दिला आहे.तसेच कांबळी कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 (       12 जून ला हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार झाल्याची घटना घडली होती. राजेंद्र अर्जुन कांबळी ( वय 45 वर्षे ) असे वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव असून हळदा येथील रहिवाशी आहे. Chandrapur Tiger Attack )
  1. पहिली घटना सविस्तर वाचा :  बातमी वाचा 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.