Petrol-Diesel Price Hike: महागाईचा आगडोंब! आज पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे भाव - Be New Delhi

India Petrol-diesel prices,Petrol Price Hike in India,Petrol prices news,Petrol Diesel Price,New Delhi,business,

India Petrol-diesel prices,Petrol Price Hike in India,Petrol prices news,Petrol Diesel Price,New Delhi,business,

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यातील निवडणुका होताच पेट्रोल डिझेल व महागाईचा आगडोंब होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, तो अंदाज खरा ठरत आहे. पेट्रोल-डिझेल दरात मागील सतरा दिवसात १५ वी वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोल डिझेल ८०-८५ पैशांनी महागलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या दरांत (Crude Oil Price) खूपच वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्च्या तेलाच्या आयात-निर्यातीवर परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम पेट्रोल – डिझेलच्या किमतींवर होत आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर २२ मार्च रोजी पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. २२ मार्च पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल १० रुपयांपेक्षा अधिक महागलं आहे. तसेच आज सीएनजीच्या दरांतही अडीच रुपयांची वाढ झाली आहे. आज देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही.

दरम्यान, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करांनुसार, त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चनुसार, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर ९-१२ रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत ८५ टक्के आयातीवर अवलंबून आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर १२० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. तर डिझेल १०४.७७ रुपयांवर पोहोचलं आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९६.६७ रुपयांवर पोहोचलं आहे. त्यामुळं जनता त्रस्त असून पाच राज्यातील निवडणुका होताच महागाईंन डोक वर काढलं आहे. गुरुवारच्या वाढीनंतर आज देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही.

आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. सध्या देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत १२०.५१ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत १०४.७७ रुपये प्रति लिटर आहे. तसेच, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत १०५.४१ रुपयांवर स्थिर आहे. दरम्यान, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर १२३ रुपयेच्यावर प्रति लिटर वर पोहोचला आहे.

पेट्रोल व डिझेलचे दर कुठे व कसे पाहाल?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. किंवा इंडियन ऑईलचं IndianOil One Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. किंवा वेबसाईटवरुन सुद्धा माहिती मिळवू शकता.

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल दर

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर)डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई१२०.५११०४.७७
दिल्ली१०५.४१९६.६७
चेन्नई११०.८५१००.९४
कोलकाता ११५.१२९९.८३

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.